दिल्लीत आरएसएस कार्यालयाबाहेर आंदोलकांना बेदम मारहाण
By Admin | Updated: February 1, 2016 16:23 IST2016-02-01T15:01:10+5:302016-02-01T16:23:59+5:30
नवी दिल्लीतील झंडेवाला येथील आरएसएसच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करणा-या आंदोलकांना पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे, निदर्यता दाखवत मारहाण केल्याचा धक्कादायक कव्हिडीओ समोर आला आहे.

दिल्लीत आरएसएस कार्यालयाबाहेर आंदोलकांना बेदम मारहाण
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवी दिल्लीतील झंडेवाला येथील कार्यालयाबाहेर निदर्शने करणा-या आंदोलकांना पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे, निदर्यता दाखवत मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
पोलिसांनी आंदोलकांवर फक्त लाठीचार्जच केला नाही तर, आंदोलकांच्या केसाला धरुन जमिनीवर आपटले. पोलिसांनी मुलांप्रमाणेच मुलींनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.
आपल्या एकाही स्वंयसेवकाचा या मारहाणीशी संबंध नसल्याचे आरएसएसने म्हटले आहे. शनिवारी आंदोलक आरएसएसच्या झंडेवाला येथील कार्यालयाबाहेर गोळा झाले होते. त्यांच्या हातात रोहितला न्याया द्या अशी मागणी करणारे फलक होते.
पोलिसांनी घोषणाबाजी करणा-या आंदोलकांची पाठ काढून त्यांना मारहाण केली. पोलिसांनी आम्हाला बॅरिकेडस जवळ रोखून दुस-या मार्गाने जाण्यास सांगितले तेवढयात एक गट आमच्यावर धावून आला आणि त्यांनी मारहाण केली असे एका आंदोलकाने सांगितले.