केटीएचएम केंद्रात प्रश्नपत्रिका विलंबाने
By admin | Updated: May 8, 2014 19:45 IST
वैद्यकीय सामाईक परीक्षा : सात हजार विद्यार्थ्यांची हजेरी
केटीएचएम केंद्रात प्रश्नपत्रिका विलंबाने
वैद्यकीय सामाईक परीक्षा : सात हजार विद्यार्थ्यांची हजेरीनाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या सामाईक परीक्षेदरम्यान केटीएचएम महाविद्यालयातील केंद्रावर विद्यार्थ्यांना उशिराने प्रश्नपत्रिका मिळाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. तब्बल पंधरा ते वीस मिनिटे प्रश्नपत्रिका विलंबाने मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी जादा वेळेची मागणी केली होती; मात्र वेळ वाढवून न मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत वैद्यकीय अभ्यासक्र मासाठी एमएच-सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा शहरातील १४ केंद्रांवर घेण्यात आली. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात आली. नाशिकमधील केटीएचएम केंद्रावर मात्र विद्यार्थ्यांना विलंबाने प्रश्नपत्रिका मिळाल्याची तक्रार होत आहे. वर्गातील पर्यवेक्षकाने प्रश्नपत्रिका संच वर्गात फोडणे अपेक्षित असताना, प्रश्नपत्रिकेचा संच हा फोडलेल्या अवस्थेत शिपाई घेऊन आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे अगोदरच विलंब आणि त्यातही प्रश्नसंच उघडलेल्या अवस्थेत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी नोंदविली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. विद्यार्थ्यांना वाढीव वेळदेखील मिळाली नाही. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली.आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाची १२४ महाविद्यालये असून, ५७१० जागा उपलब्ध आहेत. या प्रवेश परीक्षेसाठी राज्यातून एकूण एक लाख ५३ हजार २२९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. नाशिक जिल्ात सात हजार ३९५ विद्यार्थ्यांपैकी सात हजार १४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या प्रवेश परीक्षेसाठी नाशिक जिल्ात एकूण १८ शाळा, महाविद्यालये यांची परीक्षा केंद्रे म्हणून निवड करण्यात आली होती. या प्रवेश परीक्षेचा निकाल १४ जूनपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)--इन्फो--गैरप्रकार नाहीशहरातील कोणत्याही केंद्रावर कोणताही गैरप्रकार अथवा विद्यार्थ्यांना उशिराने प्रश्नपत्रिका मिळालेली नाही. तशी कोणतीही माहिती आलेली नाही. जिल्ात सर्वच केंद्रांवरील परीक्षा या सुरळीत आणि शांततेत पार पडल्या. - डॉ. सी. डी. डांगे, जिल्हा संपर्कअधिकारी