काश्मिरमधून कलम ३७० हटवा - अनुुपम खेर
By Admin | Updated: December 27, 2015 17:30 IST2015-12-27T17:30:19+5:302015-12-27T17:30:19+5:30
काश्मिरमधून कलम ३७० हटवले आणि अन्य राज्यातील लोकांना काश्मिरमध्ये स्थायिक होण्याची संधी दिली पाहिजे.

काश्मिरमधून कलम ३७० हटवा - अनुुपम खेर
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २७ - काश्मिरमधून कलम ३७० हटवले आणि अन्य राज्यातील लोकांना काश्मिरमध्ये स्थायिक होण्याची संधी दिली तर, काश्मिर समस्या सुटेल असे मत अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले. काश्मिरी पंडितांसाठी सरकारने स्वतंत्र वसाहत बांधावी अशी मागणीही त्यांनी केली.
ज्या दिवशी काश्मिरमधून कलम ३७० हटवले जाईल त्या दिवशी काश्मिरची समस्या सुटेल. ज्या दिवशी बंगाल, पंजाब, गुजरात आणि देशातील अन्य राज्यातून लोकांना काश्मिरमध्ये स्थायिक होण्याची संधी मिळेल, समस्या आपोआप सुटेल असे अनुपम खेर म्हणाले.
काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापन करण्याला माझा पाठिंबा आहे. काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापन झाल्यानंतर तिथे अन्य लोकांना रहायचे असेल तर, त्यांना परवानगी मिळाली पाहिजे असे खेर म्हणाले.