शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यास WHO कडून विलंब; PM मोदींच्या अमेरिका दौऱ्याकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 08:06 IST

भारत बायोटेक या स्वदेशी औषध कंपनीने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यास जागतिक आरोग्य संघटना विलंब लावत आहे.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : भारत बायोटेक या स्वदेशी औषध कंपनीने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यास जागतिक आरोग्य संघटना विलंब लावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले असून, ते पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. कोव्हॅक्सिनच्या वापराला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानेही अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळेही मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात अडथळा येण्याच्या शंकेने भारत चिंताग्रस्त झाला आहे. 

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक कंपनीने संयुक्तरित्या कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली कोरोना लस घेतलेल्या व्यक्तिलाच युरोप किंवा अमेरिकेत प्रवेश देण्यात येतो. कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेने लवकरात लवकर मान्यता द्यावी, म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यातील अमेरिका दौऱ्यामध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी मागणी भारताने जागतिक आरोग्य संघटनेकडे लावून धरली आहे. 

त्याचसाठी  केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी त्या संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची ऑगस्टमध्ये भेट घेऊन चर्चा केली होती. हीच मागणी मांडवीय यांच्या आधीचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही केली होती. जागतिक आरोग्य संघटनेतील लस विभागाचे सहाय्यक संचालक मरिन सिमाओ यांनी भारतीय अधिकाऱ्यांना असे कळविले की, जागतिक आरोग्य संघटनेकडून कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत मान्यता दिली जाईल. कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला इराण, फिलिपाईन्स, मॉरिशस, मेक्सिको, गियाना, नेपाळ, पेरुग्वे, झिम्बाब्वे या देशांनीही मान्यता दिली आहे. ब्राझिलने कोव्हॅक्सिन खरेदी करण्यासाठी संबंधित कंपनीशी करार केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आजवर फायझर - बायोएनटेक, ॲस्ट्राझेनेका (हिचे भारतातील रुप म्हणजे कोविशिल्ड), जॉन्सन ॲण्ड जॉन्सन, मॉडेर्ना, सिनोफार्म या कंपन्यांच्या लसींच्या आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे.

लवकरच निर्णय होण्याची शक्यता

कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेकडून लवकरच मान्यता मिळेल. त्यामुळे त्याबद्दल चिंता करण्याचे काही कारण नाही. कोव्हॅक्सिनसंदर्भात पुरविलेल्या माहितीचा जागतिक आरोग्य संघटना सध्या अभ्यास करत आहे. कोव्हॅक्सिनबाबत ही संघटना लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत ८ हजारांनी घट

देशभरात गेल्या चोवीस तासांमध्ये ३० हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण सापडले व आणखी ४३१ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ८ हजारांनी घट झाली. राज्यांमध्ये सर्वाधिक १७ हजार नवे रुग्ण एकट्या केरळमध्ये आढळले. कोरोना रुग्णांची एकूण आकडेवारी ३ कोटी ३३ लाखांवर पोहोचली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिकाWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना