शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 8:56 AM

राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्‍यावर आहेत.

लडाख- गलवान खोऱ्यातील चीन अन् भारतीय जवानांमधील रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपीन रावत, लष्करप्रमुख मनोज नरवणेही यांच्यासोबत शुक्रवारी सकाळी लेहमध्ये दाखल  झाले आहेत. राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्‍यावर आहेत. (Defence Minister Rajnath Singh leaves for Leh)दौर्‍याच्या पहिल्या दिवशी राजनाथ सिंह लडाखमध्ये असतील, तर शनिवारी ते जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरला जाणार आहेत. भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाच्या परिस्थितीत दोन आठवड्यांपूर्वी (3 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अचानक लडाख दौरा केल्यानं सर्वच आश्चर्यचकित झाले होते, तसेच लडाखमधूनच मोदींनी चीनला कडक संदेश दिला होता. चीनसोबत तणावानंतर संरक्षणमंत्र्यांचाही हा पहिलाच दौरा आहे. मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही भागांना भेटी देईन. सीमा भागात तैनात सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधणार आहे” असे ट्विट राजनाथ यांनी केले.पूर्व लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उभय पक्षांमध्ये नुकतीच चर्चेची चौथी फेरी झाली. याआधी 6 जून, 22 जून आणि 30 जूनला उच्चस्तरीय चर्चा झाल्या होत्या. मंगळवारपासून सुरू झालेली बैठक बुधवारी पहाटेपर्यंत लांबली होती. भारतीय आणि चिनी सैन्य दलाच्या कमांडर्समध्ये झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) ताणतणाव कमी करण्याच्या दिशेने चर्चा केली आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहindia china faceoffभारत-चीन तणाव