शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Rajnath Singh : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 17:17 IST

Defence Minister Rajnath Singh tests Covid positive : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,79,723 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आता अनेक नेते मंडळींना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 

"आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सौम्य लक्षणं आहेत. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घ्यावे आणि तपासणी करून घ्यावी" असं राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी देखील अनेक नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 4,033 वर पोहोचला आहे.

दिल्लीमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. राजधानीत आधीपासून अस्तित्वात असलेल्या कोरोना डेल्टा व्हेरिएंटसह, ओमायक्रॉन व्हेरिएंट देखील पसरत आहे. कोरोनाच्या संकटात आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर बरे होत आहेत. ओमायक्रॉन हा सौम्य आहे आणि डेल्टाच्या तुलनेत त्याची लागण झालेल्या रुग्णांना कमी वेळात डिस्चार्ज दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 185 रुग्ण आले आहेत. त्यापैकी 150 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरीही सोडण्यात आले आहे. रुग्णांपैकी बहुतेक जणांना फक्त सौम्य लक्षणे आहेत आणि 5 ते 7 दिवसांनी डिस्चार्ज मिळत आहे. तर डेल्टाच्या काळात 14 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत असे. अशा रूग्णांवर ओमायक्रॉन डेडिकेटेड हॉस्पिटल असलेल्या बत्रा हॉस्पिटलमध्ये देखील उपचार केले जातात. रुग्णालयाचे संचालक डॉ. सीएल गुप्ता यांनी आतापर्यंत 30 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. बहुतेक रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि प्रोटोकॉलनुसार निगेटिव्ह चाचणी घेतल्यानंतर आठव्या दिवशी त्यांना सोडण्यात येत आहे. रुग्ण लवकर बरे होत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारत