शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची स्वदेशी 'तेजस' लढाऊ विमानामधून भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 11:33 IST

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस लढाऊ विमानामधून उड्डाण केले.

बंगळुरू  - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस लढाऊ विमानामधून उड्डाण केले. तेजय विमानातून उड्डाण करणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत. तेजसमधून उड्डाण करणे हा सुखद अनुभव असल्याचे मत राजनाथ सिंह यांनी उड्डाणानंतर व्यक्त केले. 

तेजसमधून अर्धा तास उड्डाण करून माघारी परतल्यावर राजनाथ सिंह म्हणाले की, ''तेजसमधून उड्डाण करणे हा सुखद अनुभव आहे. हे विमान उत्तम आणि आरामदायक आहे. मी या उड्डाणाचा आनंद घेतला. अशा विमानाच्या निर्मितीसाठी मी एचएएल, डीआरडीओ आणि इतर संस्थांचे अभिनंदन करतो. आज आपण या विमानांची जगातील इतर देशांमध्ये निर्यात करण्याच्या स्तरापर्यंत पोहोचलो आहोत.''

स्वदेशी बनावटीचे तेजस विमान युद्धादरम्यान, रणभूमीमध्ये शस्त्रास्त्रांचा मारा करण्यामध्ये तसेच शत्रुच्या क्षेपणास्त्रांचा सामना करण्यामध्ये सक्षम आहे. हवेत उड्डाण करण्यात आणि  युद्धामध्ये हलकी लढाऊ विमाने अधिक यशस्वी ठरतात. तेजस हे त्याच श्रेणीतील आहे. हे विमान पाकिस्तान आणि चीनकडे असलेल्या या श्रेणीमधील विमानांच्या तुलनेत अधिक सक्षम आहे. 

भारतीय बनावटीचे तेजस हे हलक्या जातीचे विमान भारतीय बनावटीच्या तेजस हे हलक्या जातीचे विमान आहे. या विमानाची संकल्पना 1983 मध्ये समोर आली होती. त्यानंतर दहा वर्षांनी 1993 मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. तेजस विमानाची निर्मिती हिंदुस्तान एअरोनॉटिकल लिमिटेड (HAL) या कंपनीने केली आहे. 

म्हणून तेजसचे वजन आहे कमी स्वदेशी बनावटीचे तेजस हे हलक्या विमानांच्या श्रेणीमधील लढाऊ विमान आहे. या विमानाचे आवरण कार्बन फायबरपासून बनवण्यात आलेले आहे. त्यामुळे धातूपासून बनवण्यात येणाऱ्या विमानांच्या तुलनेत हे विमान वजनाने खूप हलके आहे. मात्र वजनाने हलके असले तरी इतरक विमानांच्या तुलनेत हे विमान अधिक मजबूत आहे. 

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहindian air forceभारतीय हवाई दलfighter jetलढाऊ विमान