शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही संरक्षणासाठी डील करतो, ते संरक्षणाचं डील करतात; सीतारामन यांचा काँग्रेसवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 15:03 IST

राफेल डीलसाठी 8 वर्ष का लावलीत? संरक्षणमंत्र्यांचा काँग्रेसला सवाल

नवी दिल्ली: काँग्रेस सरकारला संरक्षण विभागाच्या गरजा कधीही समजल्या नाहीत. यासाठी त्यांनी आपल्या शेजारी देशांकडून धडा घ्यावा, असा सल्ला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल डीलवर भाष्य करताना दिला. आम्ही संरक्षणासाठी डील करतो. ते संरक्षणाचं डील करतात, अशी खरमरीत टीका सीतारामन यांनी काँग्रेसवर केली. राफेल डीलसाठी 8 वर्षे का लागली आणि यानंतरही एकही राफेल विमान भारतात का आणता आलं नाही?, असे प्रश्न संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेसला विचारले. संसदेत गेल्या काही दिवसांपासून संसदेत राफेल डीलचा मुद्दा गाजतो आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हा मुद्दा सतत लावून धरला आहे. परवा राहुल गांधींनी राफेल डीलवरुन थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. राफेल डीलबद्दल मोदींनी 20 मिनिटं चर्चा करावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या आरोपांना आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं. मी आणि सरकार राफेल डीलसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. मात्र आमच्या उत्तरांची काँग्रेसला भीती वाटते, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसला 2014 पर्यंत राफेल डील पूर्ण का करता आलं नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसला त्यांच्या कार्यकाळात एकही विमान देशात का आणता आलं नाही, याचंही उत्तर त्यांनी द्यावं, असं आव्हान संरक्षणमंत्र्यानी द्यावं. 'चीननं त्यांच्या ताफ्यात जवळपास 4 हजार विमानं दाखल केली आहेत. मात्र काँग्रेसनं याच कालावधीत काय केलं? ज्या 126 विमानांचा उल्लेख केला जात आहे, ती कुठे आहेत?', अशा प्रश्नांच्या फैरी संरक्षणमंत्र्यांनी झाडल्या. त्यांच्या निवेदनादरम्यान काँग्रेस खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. देशाच्या चारही बाजूंना संकटं आहेत. परिस्थिती अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे आपण प्रत्येक संकटासाठी सज्ज राहायला हवं, असं सीतारामन म्हणाल्या.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस