शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पराभव दक्षिणेत आता टेन्शन उत्तरेत; नेत्यांची वानवा; भिस्त मोदी-योगींवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 09:19 IST

...या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण २३९ जागा असून, त्यापैकी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपनेच १८३ जागा जिंकल्या आहेत.

सुनील चावके -

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रभावी स्थानिक चेहऱ्याअभावी केवळ पंतप्रधान मोदींच्या करिश्म्यावर विसंबून राहिलेल्या भाजपला आता हिंदी भाषक राज्यांमध्येही अशाच आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वगळता बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगढ, हरयाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भाजपचे पूर्ण वर्चस्व असलेल्या राज्यांमध्ये जनाधार असलेल्या नेत्यांची वानवा आहे. परिणामी, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये हिंदी भाषक राज्यांमध्ये भाजपला सर्वस्वी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या करिश्म्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.प्रभावी चेहरा कुठे नाही?भाजपकडे उत्तर प्रदेश वगळता बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, पंजाब, छत्तीसगढ, हरयाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि चंडीगडमध्ये जनाधार असलेले प्रभावी चेहरेच नाहीत. या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण २३९ जागा असून, त्यापैकी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपनेच १८३ जागा जिंकल्या आहेत.

कुठे काय?- छत्तीसगड : माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांचा पर्याय देणारा चेहरा नाही.- झारखंड : भाजपशी जनाधार असलेला चेहरा नाही.- हरयाणा : सलग नऊ वर्षांपासून मुख्यमंत्री असलेले मनोहरलाल खट्टर यांच्याविषयी जनतेत रोष आहे.- दिल्ली : आपविरोधात दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मार खाणाऱ्या भाजपला अजूनही दमदार चेहरा गवसलेला नाही.- उत्तराखंड : पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री बदलणाऱ्या भाजपने पुन्हा बहुमत मिळविले असले, तरी मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनाच पराभवाचा धक्का बसला होता.- हिमाचल प्रदेश : भाजपने अलीकडेच सत्ता गमावली आहे.- पंजाब : इतर पक्षांशी स्पर्धा करताना भाजपला अजून बस्तान बसविता आलेले नाही.

भाजप धाडस दाखवेल?मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढून विजय मिळविणे भाजपसाठी दुरापास्त ठरणार आहे. मर्जीतून उतरलेल्या वसुंधरा राजेंऐवजी अन्य नेत्याला पक्षाचे नेतृत्व सोपविण्याचे धाडस भाजपश्रेष्ठींना दाखविता आलेले नाही. 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारण