शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नोएडाचं 'ते' भूत योगी आदित्यनाथांच्या मानगुटीवर बसलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 13:15 IST

उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात नोएडाच्या भुताची चर्चा

लखनऊ: गोरखपूर, फुलपूर पाठोपाठ कैराना लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या पराभवानंतर उत्तर प्रदेशात नोएडाच्या भुताची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मानगुटीवर नोएडातील 'ते' भूत बसलंय का?, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. नोएडाला भेट देणारा मुख्यमंत्री निवडणुकीत पराभूत होतो किंवा त्याला खुर्ची सोडावी लागते, अशी एक अंधश्रद्धा उत्तर प्रदेशात आहे. ही अंधश्रद्धा मोडून काढण्याचं धाडस गेल्या डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दाखवलं. त्यांनी नोएडाला  भेट दिली. मात्र तेव्हापासून झालेल्या चार निवडणुकांमध्ये आदित्यनाथ यांना भाजपाला यश मिळवून देता आलेलं नाही. नोएडाचा दौरा करणाऱ्या मुख्यमंत्र्याला खुर्ची सोडावी लागते, या अंधश्रद्धेची सुरुवात 1980 च्या दशकात झाली. त्यावेळी वीर बहादूर सिंह यांना नोएडाला भेट दिली होती. नोएडावरुन परत येताच त्यांना पक्षानं मुख्यमंत्रिपदावरुन हटवलं होतं. यानंतर उत्तर प्रदेशच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी नोएडाला जाणं टाळलं. राजनाथ सिंह मुख्यमंत्री असताना त्यांनीही नोएडाचा दौरा केला नव्हता. 2011 मध्ये मेट्रो सेवेच्या उद्घाटनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मायावती नोएडाला गेल्या होत्या. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत मायावती यांना पराभूत व्हावं लागलं. मायावती यांच्यानंतर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनीही नोएडाला जाणं टाळलं. अखिलेश यांच्या कार्यकाळात एनसीआरमधील एका मोठ्या उद्घाटनाचं उद्घाटन झालं. मात्र अखिलेश यांनी नोएडाचा इतका धसका होता की, त्यांनी लखनऊमधील त्यांच्या निवासस्थानावरुन नोएडातील प्रकल्पाचं उद्घाटन केलं. मात्र तरीही 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपानं अखिलेश यादव यांचा पराभव केला.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशkairanaकैराना