दीपा कर्माकरने इतिहास रचत केली रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत एंट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 12:18 IST2016-04-18T09:30:03+5:302016-04-18T12:18:47+5:30
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे, एकूण 52.698 पॉईंट्स कमावत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत आपलं स्थान नक्की केलं आहे

दीपा कर्माकरने इतिहास रचत केली रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत एंट्री
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १८ - भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय जिमनॅस्ट आहे. 22 वर्षीय दीपा कर्माकरने एकूण 52.698 पॉईंट्स कमावत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत आपलं स्थान नक्की केलं आहे.
नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड जिमनॅस्टीक चॅम्पिअनशीपमध्ये पाचव्या स्थानावर राहिल्यामुळे दीपा कर्माकरची ऑलिम्पिकमध्ये जाण्याची संधी हुकली होती. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दीपा कर्माकरला अगोदर रिझर्व्हवर ठेवण्यात आलं होतं. पण गेल्याच महिन्यात तिची निवड झाल्याचं कळवण्यात आलं होतं. 2014मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकून दीपा कर्माकरने अगोदरच इतिहास रचला होता. नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड जिमनॅस्टीक चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीत दाखल होणारी ती पहिला महिला जिमनॅस्ट होती.