अतिरिक्त धान्य शासनजमा करण्यासाठी धरणे

By Admin | Updated: July 7, 2015 22:56 IST2015-07-07T22:56:08+5:302015-07-07T22:56:08+5:30

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत नोव्हेंबर २०१३ मध्ये उचल करण्यात आलेले धान्य पंचनामा करून, शासनजमा करण्यात यावे, तसेच यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा आगर येथील निलंबित रास्तभाव दुकान परवानाधारक पी.एल. शिरसाट यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.

Deduction of additional food grains | अतिरिक्त धान्य शासनजमा करण्यासाठी धरणे

अतिरिक्त धान्य शासनजमा करण्यासाठी धरणे

ोला: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत नोव्हेंबर २०१३ मध्ये उचल करण्यात आलेले धान्य पंचनामा करून, शासनजमा करण्यात यावे, तसेच यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा आगर येथील निलंबित रास्तभाव दुकान परवानाधारक पी.एल. शिरसाट यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या आदेशानुसार पी.एल.शिरसाट यांचा आगर येथील रास्तभाव दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. यासंदर्भात त्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली असून, विभागीय आयुक्तांनी ३१ मार्च रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच नोव्हेंबर २०१३ मध्ये उचल करण्यात आलेले धान्याचा पंचनामा करून शासनजमा करण्यात यावे, या मागणीसाठी पी.एल.शिरसाट यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यासंदर्भात आठ दिवसांत चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
फोटो.....07 सीटीसीएल..07.....

Web Title: Deduction of additional food grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.