शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 06:48 IST

PM Kisan Yojana : योजनेत दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता ज्यांना मिळाला, त्यांतील एक तृतीयांशपेक्षा कमी शेतकरी चौथ्या हप्त्याचे लाभार्थी असतील.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळविणाऱ्यांची संख्या कमी होत चालल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. योजनेत दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता ज्यांना मिळाला, त्यांतील एक तृतीयांशपेक्षा कमी शेतकरी चौथ्या हप्त्याचे लाभार्थी असतील. महाराष्ट्रात पहिला हप्ता मिळालेल्यांच्या तुलनेत चौथ्या हप्त्याच्या लाभार्थींची संख्या २0 टक्के आहे.सरकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी, प्राप्तिकर भरणारे, व्यावसायिकांना योजनेतून वगळण्यात आल्याने, तसेच अनेक नव्या अटी घातल्याने लाभार्थींची संख्या कमी झाली असावी, असे समजते. कृषी मंत्रालयाने संसदीय समितीला सांगितले की, १४ कोटी शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करण्याचे लक्ष्य होते. पण निम्म्या शेतकऱ्यांना सामील केले. शेतजमिनीचे पुरावे नसणे, आधारशी खाते लिंक नसणे, बँक खात्यांतील त्रुटी आणि ग्रामीण भागात इंटरनेटची संथ सेवा यांमुळे असे घडले. त्यावर संसदीय समितीने सर्व त्रुटी दूर करून आणि राज्य सरकारांची मदत घेत योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना दिल्या आहेत. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात ८१ लाख ८६ हजार शेतकरी लाभार्गी होते. पहिला हप्ता ७६ लाख २१ हजारांना मिळाला. दुसऱ्या हप्त्याच्या वेळी ही संख्या ६७ लाख होती. तिसरा हप्ता मिळाला ४८ लाख ५३ हजार शेतकऱ्यांना आणि चौथ्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे १५ लाख २८ हजार.उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १ कोटी ८३ लाख शेतकऱ्यांना पैसे मिळाले. चौथ्या हप्त्यासाठीच्या शेतकऱ्यांची संख्या आहे ७६ लाख. प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी तीन हप्त्यांत मिळून ६ हजार रुपये देण्याची ही योजना आहे. सुरुवातीला दोन हेक्टर शेती असलेल्यांना ती लागू केली. नंतर शेतीच्या आकाराची मर्यादा काढण्यात आली.आठ कोटींवरून संख्या ३ कोटींवरया १ जानेवारी रोजी तयार करण्यात आलेल्या यादीनुसार लाभार्थी शेतकºयांची संख्या ८ कोटी ५५ लाख आहे. मात्र, पहिला हप्ता ८ कोटी १२ लाख शेतकºयांना मिळाला. दुसरा हप्ता मिळालेल्यांची संख्या होती ७ कोटी ४६ लाख आणि तिसºया हप्त्यात ५ कोटी ९६ लाख शेतकºयांनाच दोन हजार रुपयांची रक्कम मिळाली. चौथ्या हप्त्यासाठी लाभार्थींची संख्या दाखविली आहे २ कोटी ९0 लाख.

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना