सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घट
By Admin | Updated: August 22, 2014 01:50 IST2014-08-22T01:50:51+5:302014-08-22T01:50:51+5:30
सलग सहाव्या दिवशी राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली.

सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घट
नवी दिल्ली : सलग सहाव्या दिवशी राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली. गुरुवारी सोन्याचा भाव 22क् रुपयांनी कोसळून तीन आठवडय़ांच्या नीचांकी पातळीवर 28,28क् रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर व्यापा:यांनी मोठय़ा प्रमाणात विक्री केल्याने ही घसरण दिसून आली. औद्योगिक संस्था आणि नाणो निर्मात्यांच्या मागणीत घट झाल्याने चांदीचा भावही 35क् रुपयांनी उतरून 42,65क् रुपये प्रतिकिलोवर आला.
सराफा व्यापा:यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचा भाव दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला. यामुळे विक्रीवर दबाव वाढला. परिणामी, मागणी घटल्याने या मौल्यवान धातूचा भाव गडगडला.
दिल्लीत 99.9 व 99.5 टक्के सोन्याचा भाव प्रत्येकी 22क् रुपयांनी घसरून अनुक्रमे 28,28क् रुपये आणि 28,क्8क् रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)