सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घट
By Admin | Updated: November 28, 2014 23:46 IST2014-11-28T23:46:54+5:302014-11-28T23:46:54+5:30
मागणी घटत असल्याने सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात 11क् रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव 26,67क् रुपये प्रति 1क् ग्रॅम झाला.

सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घट
नवी दिल्ली : मागणी घटत असल्याने सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात 11क् रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव 26,67क् रुपये प्रति 1क् ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव विक्रीच्या दबावाने 55क् रुपयांनी घटून 36,2क्क् रुपये प्रतिकिलोवर आला.
बाजार जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर आभूषण निर्मात्यांची मागणीत घट झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड तेलाच्या दरातील घसरणीचा जागतिक सराफ्यावर परिणाम झाला.
सिंगापूर येथे सोन्याचा भाव क्.9 टक्क्यांनी घटून 1,181.84 डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव 1.2 टक्क्यांच्या घसरणीसह 16.क्5 डॉलर प्रतिऔंस झाला. ही गेल्या 2क् नोव्हेंबर रोजीची नीचांकी पातळी आहे. गुंतवणूक समभाग बाजारात वळती झाल्याने सराफा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. दिल्लीत 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 1क्क् रुपयांनी घटून अनुक्रमे 26,67क् रुपये आणि 26,47क् रुपये प्रति 1क् ग्रॅम झाला. यात गेल्या तीन दिवसांत 15क् रुपयांची घट झाली आहे. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 1क्क् रुपयांनी कमी होऊन 23,7क्क् रुपये झाला. तयार चांदीचा भाव 55क् रुपयांच्या घसरणीसह 36,2क्क् रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 45क् रुपयांनी घटून 35,61क् रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव 1,क्क्क् रुपयांनी स्वस्त होऊन खरेदीकरिता 61,क्क्क् रुपये व विक्रीसाठी 62,क्क्क् रुपये प्रतिशेकडा झाला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)