शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत बाळाला केलं मृत घोषित, डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 08:44 IST

जिवंत बाळाला मृत घोषित केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांचं निलंबन करण्याचा निर्णय मॅक्स हेल्थकेअर रुग्णालयाने घेतला आहे. शनिवारी रुग्णालयाची यासंबंधी बैठक पार पडली. या बैठकीत निष्काळजी डॉक्टरांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्दे जिवंत बाळाला मृत घोषित केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांचं निलंबनमॅक्स हेल्थकेअर रुग्णालयाने केली कारवाई

नवी दिल्ली - जिवंत बाळाला मृत घोषित केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांचं निलंबन करण्याचा निर्णय मॅक्स हेल्थकेअर रुग्णालयाने घेतला आहे. शनिवारी रुग्णालयाची यासंबंधी बैठक पार पडली. या बैठकीत निष्काळजी डॉक्टरांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. एपी मेहता आणि विशाल गुप्ता अशी या डॉक्टरांची नावे आहेत. 'घटनेची चौकशी अद्याप सुरु असून यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनही सहभागी आहे. मात्र तोपर्यंत आम्ही दोन्ही डॉक्टरांच्या निलंबनाचा निर्णय घेतला आहे', अशी माहिती मॅक्स हेल्थकेअरकडून देण्यात आली आहे. 

मॅक्स हेल्थकेअर रुग्णालयात जिवंत बाळाला मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. इतकंच नाही तर जन्माला आलेली जुळी मुले मृत असल्याचं सांगत चक्क प्लास्टिकच्या पिशवीत बंद करुन सोपवण्यात आलं होतं.

मॅक्स हॉस्पिटलमध्ये गुरुवारी महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यामधील एक मुलगा होती तर दुसरी मुलगी. प्रसूतीदरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याचं कुटुंबियांना सांगण्यात आलं होतं. जुळ्या बाळांचा जन्म झाल्यानंतर त्यामधील एक बाळ जिवंत असून त्याची खूप काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं. बाळाला नर्सरीमध्ये ठेवण्याचा सल्ला कुटुंबाला देण्यात आला. नेमकं काय करायचं यावर कुटुंबिय चर्चा करत असतानाच, दुस-या बाळाचाही मृत्यू झाला आहे असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. 

रुग्णालयाने दोन्ही बाळांचा मृतदेह एका कागद आणि कपड्यात गुंडाळला, आणि चिकटपट्टी लावून एका प्लास्टिकच्या पिशवीतून नातेवाईकांकडे सोपवला. बाळांना मृत घोषित केल्यानंतर कुटुंब अंत्यसंस्कारासाठी जात असताना एक बाळ हालचाल करत असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी तात्काळ काश्मीरी गेट परिसरातील रुग्णालयात धाव घेतली. तिथे बाळ जिवंत असल्याचं सांगण्यात आलं. 

'रस्त्यात चालत असताना हालचाल होत असल्याचं लक्षात येताच आम्ही कागद फाडून पाहिलं तर आतमध्ये बाळ जिवंत असल्याचं पाहिलं. आम्ही बाळाला अग्रवाल रुग्णालयात दाखल केलं आहे', असं बाळाच्या आजोबांनी सांगितलं होतं.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर