महिला बचत गटाचा निर्णय

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:20+5:302015-07-06T23:34:20+5:30

आदमपूर : खतगाव येथील अवैध व्यवसाय बंद ठेवण्यासाठी महिला बचत गट सरसावला आहे़ यानिमित्ताने ३ जुलै रोजी आयोजित ग्रामसभेला मधुकरराव पाटील खतगावकर, बाळासाहेब पाख़तगावकर उपस्थित होते़ यावेळी सरपंच राजू वाघमारे, उपसरपंच रवि पाटील, पंढरीनाथ पाटील, गोविंद पेटेकर, शंकर पाटील, गंगुबाई उदेवार यांचीही उपस्थिती होती़

Decision of women saving group | महिला बचत गटाचा निर्णय

महिला बचत गटाचा निर्णय

मपूर : खतगाव येथील अवैध व्यवसाय बंद ठेवण्यासाठी महिला बचत गट सरसावला आहे़ यानिमित्ताने ३ जुलै रोजी आयोजित ग्रामसभेला मधुकरराव पाटील खतगावकर, बाळासाहेब पाख़तगावकर उपस्थित होते़ यावेळी सरपंच राजू वाघमारे, उपसरपंच रवि पाटील, पंढरीनाथ पाटील, गोविंद पेटेकर, शंकर पाटील, गंगुबाई उदेवार यांचीही उपस्थिती होती़

दत्तात्रय मंगनाळे यांना निरोप
कंधार : येथील आगारातील दत्तात्रय मंगनाळे चालक पदावरून सेवानिवृत्त झाले़ त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला़ यावेळी आगारप्रमुख मनोहर वाकळे, पं़स़ सभापती बालाजी पांडागळे, डॉ़श्याम तेलंग, दिगंबर पेटकर, विठ्ठलराव डांगे, धोंडिबा मंगनाळे, बाबुखाँ पठाण, डॉ़जायभाये उपस्थित होते़

सरचिटणीसपदी मुकनर
कुरुळा : युवा सेनेच्या सरचिटणीसपदी राजू मुकनर यांची निवड झाली़ याबद्दल आ़प्रताप पा़चिखलीकर यांनी त्यांचा सत्कार केला़ कार्यक्रमाला बाळू कर्‍हाळे, भगवान राठोड, बाळासाहेब डोमारे उपस्थित होते़

कृषि जागृती सप्ताह
बारूळ : मंडळ कृषी कार्यालयाच्या वतीने कृषी जागृती सप्ताहनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी कृषी मंडळ अधिकारी मेडपलवार, कृषी सहाय्यक मोरे, गु˜े यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले़ कार्यक्रमास कृषी सहाय्यक श्रीमती देशमुख, सूर्यदळे, मोटेगावकर, डफडे, वडजे आदीही होते़

बोधडी-किनवट बसची मागणी
बोधडी : मानव विकास कार्यक्रमांतर्गत बोधडी ते किनवट अशी बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे़ या परिसरातील असंख्य विद्यार्थी किनवट येथे महाविद्यालय व शाळांसाठी जातात़ मात्र बसची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे़ संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे़

बीडीओ कार्यालयाचे उद्घाटन
पळसा : येथे आगामी निवडणुका व जनतेच्या कामासाठी हदगाव येथे जाण्याचे काम पडू नये या उद्देशाने पळसा येथे मिनी बीडीओ कार्यालयाचे उद्घाटन सरपंच कांताबाई मुळे व उपसरपंच उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी विस्तार अधिकारी जाधव, ग्रा़वि़अ़ पांडुरंग श्रीरामवार, ग्रा़पं़ सदस्य शिवाजी मस्के, प्रकाश धनगरे, नरहरी घिरटवार, कामाजी निमडगे, कोंडबा दवणे, तंटामुक्ती अध्यक्ष पुंडलिकराव मस्के आदी उपस्थित होते़

Web Title: Decision of women saving group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.