नोटांबाबतचा निर्णय एका आठवड्यासाठी मागे घ्या- मुलायम सिंग
By Admin | Updated: November 10, 2016 20:04 IST2016-11-10T20:04:48+5:302016-11-10T20:04:48+5:30
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

नोटांबाबतचा निर्णय एका आठवड्यासाठी मागे घ्या- मुलायम सिंग
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 10 - समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. हा निर्णय सरकारने एका आठवड्यासाठी मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कॅश डिपॉझिट करण्यासाठी असलेल्या अडीच लाखांच्या मर्यादेत महिलांना सूट द्यावी आणि महिलांसाठी ही मर्यादा 5 लाख करावी अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे., नागरिकांना नियमित गरजेच्या वस्तू मिळणे देखील कठीण झाले असून रुग्णांवरील उपचारही बंद झालेत. त्यामुळे हा निर्णय सरकारने एका आठवड्यासाठी मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वी या निर्णयावर बसपा अध्यक्षा मायावती यांनीही टीका करत ही अघोषित आणीबाणी असल्याची टीका केली होती.