शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव जिल्ह्याचे लवकरच त्रिभाजन, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 14:02 IST

बेळगाव हा राज्यात सर्वात मोठा जिल्हा

बेळगाव : बेळगाव शहर आणि बेळगाव ग्रामीण असे दोन वेगवेगळे तालुके करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. बेळगाव तालुक्याचे विभाजन नक्कीच होणार मात्र कोणत्या पद्धतीने विभाजन करायचे याबद्दल अधिकारी निर्णय घेतील, असेही सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत जिल्ह्यातील आमदारांसोबत पहिल्या टप्प्याची चर्चा झाली आहे. चिकोडी आणि गोकाक असे दोन नवीन जिल्हे करा, अशी मागणी करण्यात आली आहे.बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे, ती लवकरच करू, असेही सतीश यांनी म्हटले आहे.१९८० साली पहिल्यांदा जे. एच. पटेलांनी जिल्हा विभाजनाची वात पेटवून दिली. त्यानंतर चिकोडी हा स्वतंत्र जिल्हा व्हावा, या मागणीला जोर आला. १९९७ नंतर ही मागणी अधिक जोर धरू लागली आणि बेळगाव जिल्ह्याचे तीन जिल्ह्यात विभाजन व्हावे, असा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार बेळगाव, चिकोडी आणि गोकाक जिल्हा व्हावा, अशी मागणी होत राहिली. त्याला स्वातंत्र्यदिनी ना. जारकीहोळी यांनी हूल दिली. त्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. बेळगाव हा राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे. तब्बल ४७ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या या जिल्ह्यात १८ विधानसभा, तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. १५ तालुके, ५०६ ग्रामपंचायती, ३४५ तालुका पंचायत सदस्य आणि १०१ जिल्हा पंचायत सदस्य आहेत. विस्ताराने सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगावची ओळख असली तरी विकासाच्या दृष्टिकोनातून मागासलेला जिल्हा आहे. हा जिल्हा मराठी, कन्नड आणि हिंदी असा बहुभाषिक आहे.विस्ताराने मोठा असल्याने बेळगाव जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. याबाबत वेळोवेळी चर्चा झाल्या. चिकोडीत तर दरवर्षी याबाबत आंदोलने झाली आहेत. त्याचाच धागा पकडून ना. जारकीहोळी यांनी जिल्हा आणि तालुका विभाजनाचे सूतोवाच केले आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगताना लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.कसे असतील संभावित नवे जिल्हे?बेळगाव जिल्हा : बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, यमकनमर्डी, हुक्केरी, खानापूरगोकाक / बैलहोंगल : बैलहोंगल, रामदुर्ग, कित्तूर, गोकाक, मुडलगी चिकोडी : चिकोडी, अथणी, कागवाड, निपाणी, रायबाग, कुडची

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रbelgaonबेळगाव