शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

फेक न्यूज संदर्भातील निर्णय केंद्र सरकारनं घेतला मागे, मोदींचा स्मृती इराणींना घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 12:38 IST

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेक न्यूजसंदर्भातील निर्णय मागे घेतला आहे. 

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रालयानं फेक न्यूजसंदर्भातील निर्णय मागे घेतला आहे. फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार नाही. गेल्या काही तासांपूर्वीच सरकारनं हा नियम लागू केला होता. अखेर वाढता विरोध पाहता सरकारनं हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मृती इराणींना घरचा आहेर दिल्याची चर्चा आहे.या नियमानुसार, पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा नियमाचं उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरूपी मान्यताच रद्द केली जाणार होती. परंतु सरकारवर हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयानं हा निर्णय मागे घेतला आहे. आता फक्त प्रेस काऊन्सिलमध्येच अशा प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.या निर्णयाला काँग्रेसनंही जोरदार विरोध केला होता. काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सरकारच्या फेक न्यूजसंदर्भातील निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पत्रकारांना मोकळेपणानं रिपोर्टिंग करण्याला मज्जाव करण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे. कोणती बातमी खोटी आणि कोणती बातमी खरी हे कसं समजणार, असा सवालही अहमद पटेल यांनी उपस्थित केला होता. या निर्णयाच्या माध्यमातून पत्रकारांची गळचेपी करण्याची सरकारची भूमिका तर नाही ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली होती. 

टॅग्स :Fake Newsफेक न्यूज