प्रदेशाध्यक्षांबाबत लवकरच निर्णय

By Admin | Updated: October 20, 2014 06:07 IST2014-10-20T06:07:26+5:302014-10-20T06:07:26+5:30

महाराष्ट्रात सत्तेचा सुकाणू धरणा-या भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असतील, यावरही आठवडाभरात निर्णय घेतला जाणार आहे

Decision on the State President soon | प्रदेशाध्यक्षांबाबत लवकरच निर्णय

प्रदेशाध्यक्षांबाबत लवकरच निर्णय

रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
महाराष्ट्रात सत्तेचा सुकाणू धरणा-या भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असतील, यावरही आठवडाभरात निर्णय घेतला जाणार आहे. मंत्रिपदी असलेल्या कोणालाच प्रदेशाध्यक्षपदी नेमले जाणार नसल्याची भूमिका पक्षाची असल्याचे सूत्राने सांगितले.
एकदा मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर झाले की हा तिढा संपेल. पक्षाकडे नवे नावही आहे, मात्र सध्या पतंगबाजी करू नका, असे भाजपाच्या केंद्रीय सदस्याने सांगितले. नव्या प्रदेशाध्यक्षावर बहुजन समाजातील आमदाराची वर्णी लावली जाणार असून, ती व्यक्ती विदर्भाबाहेरील असेल असे संकेत मिळाले आहेत. भाजपामधील अंतर्गत गटबाजी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांचा गट पाहून त्याविरोधी गटाचा प्रदेशाध्यक्ष राहण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांपासून अध्यक्ष असून, लोकसभा व आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले. गडकरी व मुंडे यांच्या गटबाजीत मुंडे यांनी फडणवीस यांच्या बाजूने कल दिला होता. त्यानंतर अमित शहा यांच्या टीममध्ये मुनगंटीवार बड्या पदावर असतील असे बोलले जात होते. विनोद तावडे यांचे नावही चर्चेत होते. मात्र निवडणुकांमुळे पक्षाने या दोन्ही नेत्यांना दिल्लीपासून लांब ठेवले.

Web Title: Decision on the State President soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.