शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीचा निर्णय शहरांमधून जाणा-या महामार्गांसाठी लागू नाही, सर्वोच्च न्यायालयाने केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 14:20 IST

सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय शहरांमध्ये तसंच महापालिकेच्या अख्त्यारित येणा-या शहरांना लागू नसल्याचं स्पष्ट केलं आहे

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०१६ रोजी महामार्गाच्या ५०० मीटर परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिला होताआपला निर्णय शहरांमध्ये तसंच महापालिकेच्या अख्त्यारित येणा-या शहरांना लागू नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहेउत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी पुढील आठवड्यात परवाना देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती दिली आहे

मुंबई, दि. 24 - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झालेली राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरील दारुची दुकाने पुन्हा उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे बार पुन्हा एकदा गजबजलेले दिसू शकतात. पुन्हा एकदा चिअर्स म्हणत लोक दारुच्या दुकानात बसून गप्पा मारताना दिसतील. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय शहरांमध्ये तसंच महापालिकेच्या अख्त्यारित येणा-या शहरांना लागू नसल्याचं स्पष्ट केलं आहे.  

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असणारी दारुची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला होता. यानंतर बारमालकांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला होता. मात्र आता न्यायालयाने आपल्या निर्णयात दुरुस्ती करत हा निर्णय फक्त दोन शहरांना जोडणा-या महामार्गांसाठी लागू असल्याचं सांगितलं आहे. तसंच हा आदेश महापालिका क्षेत्रातून जाणा-या रस्त्यांना लागू नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील म्हणजेच शहरांतील रस्त्यांवर असलेली दारू दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी पुढील आठवड्यात परवाना देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती दिली आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर शहरामध्ये हायवेला लागून असणारे सर्व बार सुरु होतील असं उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे. 

सरन्यायाधीश जे. एस. केहर, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठासोर ही सुनावणी झाली. महामार्गावर होणारे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०१६ रोजी केंद्र आणि राज्य सरकारांना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या ५०० मीटर परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिला होता. 

हायवेवरील दारूबंदीमुळे ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये 40 टक्के घटहायवेवरील दारूबंदीच्या या निर्णयानंतर दारू पिऊन गाडी चालविण्याने होणाऱ्या अपघातांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर आली होती. 1 एप्रिल ते 30 जूनच्या दरम्यान दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 टक्क्यांनी घटल्याचं समोर आलं होतं. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. यावर्षीच्या एप्रिल ते जून या कालावधीत दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्यांची संख्या 40 टक्क्याने घटल्यामुळे अपघाती मृत्यू तसंच जखमींचा आकडासुद्धा 11 ते 14 टक्क्यांनी घटला होता.  राज्य पोलिसांनी जमा केलेल्या माहितीनुसार हायवेवर होणाऱ्या किरकोळ अपघातांची संख्याही 21 टक्क्यांनी घटली होती.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय