उद्योगांच्या वीजदरावर लवकरच निर्णय
By Admin | Updated: February 29, 2016 00:07 IST2016-02-29T00:07:33+5:302016-02-29T00:07:33+5:30
- मुख्यमंत्री : व्हीआयएच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

उद्योगांच्या वीजदरावर लवकरच निर्णय
- ुख्यमंत्री : व्हीआयएच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटननागपूर : मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया परिषदेत विदर्भ- मराठवाड्यात दीड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. येथील उद्योगांच्या विकासासाठी त्यांना देण्यात येणार्या वीजदरावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली. उद्योग भवनात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) कार्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक विस्तारीत दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रशासकीय कार्यपद्धती सरळसोपी करून विविध शासकीय परवाने ऑनलाईन मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. येत्या चार महिन्यात ही सेवा प्रभावीपणे काम करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.