शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा ४०० किमी दूर हलविण्याचा निर्णय रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 05:31 IST

विद्यार्थी यंदाच्या वर्षापुरते तेथेच शिकतील, इच्छुकांकडून अर्ज मागवण्याचा आदेश

मुंबई : परवाना रद्द केल्याने बंद झालेली जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव तांडा येथील प्राथमिक आश्रमशाळा ४०० किमी दूर अहमदनगर जिल्ह्यात दुसऱ्या संस्थेतर्फे सुरू करण्याचा राज्य सरकारचा सात वर्षांपूर्वीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असून तळेगाव तांडा येथेच किंवा त्याच्या १० किमी परिसरात नवी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवून नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.तळेगाव तांडा येथील प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक आश्रमशाळा बंजारा मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळातर्फे चालविली जात होती. त्या आश्रमशाळेत सन २००९ मध्ये झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी झाल्यावर २३ आॅगस्ट २०१० रोजी त्या आश्रमशाळेची मान्यता रद्द केली गेली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे २ जानेवारी २०१२ रोजी तळेगाव तांडा येथील आश्रमशाळा अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेडच्या चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक आश्रमशाळा या नव्या नावाने सुरू करण्याची परवानगी सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेस दिली गेली. तळेगाव तांडा येथील विद्यार्थी चौंडीत गेले तर शिक्षक व कर्मचारी आजूबाजूच्या अन्य आश्रमशाळांमध्ये सामावून घेतले गेले.सरकारच्या या निर्णयास बंजारा शिक्षण प्रसारक मंडळाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. न्यायालयाने सरकारचा आश्रमशाळा स्थलांतराचा निर्णय रद्द केला. त्याविरुद्ध राज्य सरकार व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेने सर्वोच्च न्यायालयात अपिले केली. न्या. उदय उमेश लळित व न्या. दिनेश महेश्वरी यांच्या खंडपीठाने ती फेटाळून आश्रमशाळा स्थलांतर रद्द करणे कायम ठेवले.यंदाच्या वर्षापुरती व्यवस्थाअपिलांमध्ये दिलेल्या अंतरिम आदेशामुळे संत ज्ञानेश्वर संस्थेची चौंडी येथील आश्रमशाळा आजमितीस सुरू आहे. त्यामुळे पुढील आदेश दिले गेले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी चौंडी येथील आश्रमशाळा चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत सुरू राहू दिली जाईल. चालू शैक्षणिक वर्ष संपल्यावर चौंडी आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेतले जावे.तळेगाव तांडा येथील शिक्षक व कर्मचारी सन २०१२ पासून सलग नोकरीत आहेत असे मानून त्यांना नोकरीत कायम ठेवले जावे. मात्र ज्यांना या काळात अन्यत्र सामावून घेतले गेले नाही त्यांना २५ टक्के मागचा पगार दिला जावा. बंद केलेली तळेगाव तांडा येथील आश्रमशाळा तेथेच किंवा जवळपास पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागवून त्यावर पारदर्शी पद्धतीने निर्णय घ्यावा.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय