शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही कायदे रद्द होईपर्यंत भोजन देण्याचा केला आहे निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 03:55 IST

गाजीपूर सीमेवर शेतकऱ्यांच्या सेवेत नांदेडचे हुजूर साहिब लंगर

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : गाजीपूर सीमेवर बसलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या लंगरांत नांदेड येथील गुरुद्वारा लंगर साहिब श्री हज़ूर साहिब लंगरची सर्वात जास्त चर्चा आहे. 

येथे २५ पेक्षा जास्त लंगर शेतकऱ्यांच्या सेवेत असून नांदेड़चे लंगर सर्वात मोठे आहे. एक डिसेंबरपासून सुरू झालेल्या या लंगरमध्ये रोज हज़ारो आंदोलनकारी शेतकऱ्यांसाठी सकाळच्या चहापासून सकाळ व सायंकाळचे जेवण, दुपारचा चहा, नाश्ता तयार होतोय. या लंगरमध्ये चहा, भात, पोळ्या, वरण, अनेक प्रकारच्या भाज्या, गाज़राचा हलवा, मेक्रोनी आणि इतर खाद्यपदार्थ दिले जातात. गुरुद्वारा लंगर साहिब श्री हज़ूर साहिब लंगर चालवण्याची जबाबदारी त्याच्या पिलिभीत शाखेकडे सोपवली गेली आहे. ते जत्थेदार मोहन सिंग यांच्या देखरेखीत सुरू आहे. जत्थेदार मोहन सिंग यांना खूप उत्साह आहे. ते म्हणतात, “बाबा नरेंद्र सिंग आणि बाबा बलविंदर सिंग यांच्या आशीर्वादाने हा लंगर शेतकरी जोपर्यंत येथे बसून असतील तोपर्यंत चालेल. सरकारने लाठीमार केला, गोळ्या झाडल्या किंवा बाँबही टाकले तरी आम्ही येथून जाणार नाही.” 

आमची ५५० वर्षांची परंपरा  जत्थेदार मोहन सिंग म्हणाले, ’ही आमची ५५० वर्षांची परंपरा आहे की, शेतकरी दुसऱ्यांना खाऊ घालून स्वत: खातो. येथील स्थानिक सेवादार जेवण बनवण्याचे काम करीत आहेत. धनधान्य व इतर जिन्नसांनी भांडार भरलेले आहेत. आम्ही वर्षानुवर्षे आंदोलनकर्त्यांना खाऊ घालत राहू. जोपर्यंत तिन्ही काळे कृषी कायदे सरकार रद्द करत नाही, तोपर्यंत शेतकरी ना घरी जाईल ना लंगर बंद होईल.”

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेड