शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जनतेने दिलेला निर्णय मान्य - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 04:52 IST

जनतेने निर्णय दिला आहे. विजयाबद्दल मी मोदी यांचे अभिनंदन करतो. ही विचारांची लढाई आहे. आमचा लढा चालूच राहिल आणि आम्ही विजयी होऊन दाखवू.

- शीलेश शर्मानिवडणुकीच्या निकालातून जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे आणि काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, असे स्पष्ट करीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून याबाबत कार्यकारिणी अंतिम निर्णय घेणार आहे, असेही स्पष्ट केले. परंतु कार्यकारिणीने गांधी यांनी अशा प्रकारे राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हैराण झालेल्या काँग्रेसला या पराभवामागची काय कारणे असावीत, हेच उमजेनासे झाले आहे.राहुल गांधी यांनी पराभवाच्या कारणांवर टिप्पणी करण्यास इन्कार करतांना सांगितले की, जनतेने दिलेला निर्णय मला मान्य आहे. आजच निकाल आलेला असल्याने आम्ही त्यासंबंधित कोणत्याही मुद्यांवर प्रतिक्रिया देणार नाही.उच्चपदस्थ सूत्रांनुसार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात विचारले असतांना राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, हा मुद्या माझ्या आणि कार्यकारिणी यांच्यातील आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष लवकरच कार्यकारिणीची बैठक बोलाविणार आहे. या बैठकीत पराभवाच्या कारणांची मीमांसा करण्यासोबत राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ केल्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. आतापर्यंत मिळालेल्या संकेतानुसार कार्यकारिणी राहुल गांधी यांना अध्यक्षपद सांभाळण्याचा सल्ला देईल.जनता मालक आहे, असे मी प्रचारादरम्यान म्हणालो होतो, याची आठवण देत राहुल गांधी म्हणाले की, जनतेने आपला निर्णय दिलाआहे. विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. तथापि, ही विचारांची लढाई आहे. आमचा लढा चालूच राहिल आणि आम्ही विजयी होऊन दाखवू.अमेठीतील पराभव मान्य करुन राहुल यांनी स्मृती इराणी यांचेही अभिनंदन केले. अमेठीतील जनतेची काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.काँग्रेसचे उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांना न खचता संघर्ष चालू ठेवण्याचा सल्ला दिला. प्रचारादम्यान विरोधकांकडून माझी अनेकदा निंदा करण्यात आली. असंसदीय शब्दांचा वापर करण्यात आला. अनेक आरोप करण्यात आले; परंतु, मी त्यांना प्रेमानेच उत्तर दिले. भविष्यातही मी असा वागणार आहे; कारण प्रेमाचा कधीही पराभव होत नसतो.पत्रकार परिषदेत त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाची छाया स्पष्ट दिसून येत होती. राहुल गांधी हताश झालेले दिसले. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देतांनाही ते पुरते गोंधळून गेलेले दिसले. अनेक प्रश्नांना उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. काँग्रेसच्या पराभवामागच्या कारणांबाबत नंतर सविस्तर बोलू, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस