ईपीएफच्या पेन्शनसाठी वय वाढविण्याचा निर्णय आज?
By Admin | Updated: February 19, 2015 00:25 IST2015-02-19T00:25:57+5:302015-02-19T00:25:57+5:30
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) गुरुवारी भविष्य निधी गुंतवणुकीच्या व्यवस्थापनासाठी निवडक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांची नियुक्ती करू शकते.

ईपीएफच्या पेन्शनसाठी वय वाढविण्याचा निर्णय आज?
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) गुरुवारी भविष्य निधी गुंतवणुकीच्या व्यवस्थापनासाठी निवडक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांची नियुक्ती करू शकते. याशिवाय कर्मचारी भविष्य निधीवर आधारित कर्मचारी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्याची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करण्याचाही निर्णयही घेतला जाऊ शकतो. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) विश्वस्त मंडळाची बैठक १९ फेब्रुवारी रोजी होत असून तीत वरील दोन्ही निर्णय होऊ शकतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)