फेसबूकवरील जिहादच्या पोस्टमुळे इसिसमध्ये जाण्याचा निर्णय - नजीम

By Admin | Updated: April 28, 2017 03:27 IST2017-04-28T03:27:59+5:302017-04-28T03:27:59+5:30

इसिसच्या म्होरक्या नजीम उर्फ उमर शमशाद अहमद शेख (२६) हा फेसबूक, सोशल मीडियावरील जिहादबाबतच्या पोस्ट, माहितीमुळे प्रभावित

Decision to go to ISIS due to jihad post on Facebook - Nazim | फेसबूकवरील जिहादच्या पोस्टमुळे इसिसमध्ये जाण्याचा निर्णय - नजीम

फेसबूकवरील जिहादच्या पोस्टमुळे इसिसमध्ये जाण्याचा निर्णय - नजीम

मुंबई : इसिसच्या म्होरक्या नजीम उर्फ उमर शमशाद अहमद शेख (२६) हा फेसबूक, सोशल मीडियावरील जिहादबाबतच्या पोस्ट, माहितीमुळे प्रभावित झाल्याचे उत्तरप्रदेश एटीएसने त्याच्या केलेल्या चौकशीतून उघडकीस आले आहे. उत्तरप्रदेश एटीएस, महाराष्ट्र एटीएस, दिल्ली विशेष शाखा, आंध्रप्रदेश सीआय शाखेसह तब्बल नऊ पथकांनी पाच राज्यांमध्ये कारवाई करून मुंब्य्रातील नजीम याच्यासह उत्तरप्रदेशातील बिजनौर आणि पंजाबमधील लुधियानातून चार दहशतवाद्यांना १९ एप्रिलला बेड्या ठोकल्या. तसेच सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत तसेच गोळा केलेल्या पुराव्यानुसार इसिसचा म्होरक्या असलेल्या नजीम टोळीत नवीन सदस्य जोडणीचे, त्यांच्यासाठी पैसा उभा करणे, तरुणांची साखळी वाढविणे आदी कामे करत होता.
सौदी अरेबीयातील दमाम येथे दोन वर्षे प्लंबरची नोकरी करून त्यानंतर तो भारतात परतला होता. त्यानंतर पुन्हा २०१५ मध्ये तो सौदी अरेबियातील हबाब मक्कामध्ये नोकरीसाठी गेला. तेथे दीड वर्षे राहिला.
दरम्यानच्या काळात फेसबूक, अन्य सोशल नेटवर्र्किंग साईट्सवरील जिहादचे व्हीडिओ क्लीप, विविध पोस्टर पाहून तो प्रभावित झाला. यातूनच तोही त्यावर स्वत:ची मते मांडू लागला. याच दरम्यान त्याचा इसिससोबत संपर्क वाढला. आणि तो त्यांच्यासाठी काम करु लागल्याचे समोर आले आहे.
हबाब मक्कामध्ये एक वर्ष वास्तव्याचा परवाना मिळाला असताना जास्त काळ राहिल्याने तेथील पोलिसांनी त्याला अटक केली. १८ दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर तेथील तपास यंत्रणांनी त्याला पुन्हा भारतात पाठविल्याचे तपासात समोर आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Decision to go to ISIS due to jihad post on Facebook - Nazim