शांतता प्रस्थापित करण्याचा निर्णय
By Admin | Updated: September 21, 2015 23:34 IST2015-09-21T23:34:19+5:302015-09-21T23:34:19+5:30
भारत-पाक उभय देशांनी सोमवारी नियंत्रण रेषेवर (एलओसी) शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती दर्शवली. जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये उभय देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांची ध्वज बैठक झाली

शांतता प्रस्थापित करण्याचा निर्णय
जम्मू : भारत-पाक उभय देशांनी सोमवारी नियंत्रण रेषेवर (एलओसी) शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती दर्शवली. जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये उभय देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांची ध्वज बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी भारत-पाक दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी उल्लंघन, रहिवाशी भागांवरील हल्ले आदी मुद्यांवर चर्चा केली. शिवाय संयम बाळगून एलओसीवरील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करण्यावर सहमती दर्शवली, असे सूत्रांनी सांगितले. सुमारे अर्धा तास ही बैठक चालली. (वृत्तसंस्था)