केंद्र सरकारचा जम्मूमध्ये IIT स्थापण्याचा निर्णय
By Admin | Updated: May 2, 2016 19:13 IST2016-05-02T19:13:58+5:302016-05-02T19:13:58+5:30
जम्मू-काश्मीरच्या सरकारनं 1 मे रोजी जम्मूमध्ये आयआयटी स्थापन करण्यासाठी दिल्लीच्या आयआयटीशी करार केला आहे.

केंद्र सरकारचा जम्मूमध्ये IIT स्थापण्याचा निर्णय
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2- जम्मू-काश्मीरच्या सरकारनं 1 मे रोजी जम्मूमध्ये आयआयटी स्थापन करण्यासाठी दिल्लीच्या आयआयटीशी करार केला आहे.
दिल्लीतल्या आयआयटीच्या उच्च शिक्षण विभागाचे प्राध्यापक व्ही. रामगोपाल राव आणि जम्मूच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव हेमंत कुमार शर्मा यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. हा करार जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे.
आम्ही जम्मूत आयआयटी स्थापन करण्यासाठी सर्व परवानग्या मिळवून देऊन सर्वतोपरी सहकार्य करू, असंही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं सांगितलं आहे. आयआयटी स्थापन करण्यासाठी जग्तीतल्या नगरोट्यात जवळपास 625 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. जम्मूमध्ये आयआयटी स्थापन झाल्यास भारतात तिला 23वा क्रमांक मिळणार आहे.