सीव्हीसी, सीआयसी प्रमुखांच्या नियुक्तीचा निर्णय लांबणीवर

By Admin | Updated: May 23, 2015 23:49 IST2015-05-23T23:49:36+5:302015-05-23T23:49:36+5:30

केंद्रीय माहिती आयोग(सीआयसी )आणि केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) प्रमुखांच्या निवडीवर पंतप्रधानांच्या निवासस्थानी शनिवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही.

The decision on appointment of CVC and CIC chief will be postponed | सीव्हीसी, सीआयसी प्रमुखांच्या नियुक्तीचा निर्णय लांबणीवर

सीव्हीसी, सीआयसी प्रमुखांच्या नियुक्तीचा निर्णय लांबणीवर

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोग(सीआयसी )आणि केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) प्रमुखांच्या निवडीवर पंतप्रधानांच्या निवासस्थानी शनिवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे समितीची बैठक पुन्हा होणार आहे.
केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, बैठक शांततेत पार पडली. ज्या उमेदवारांच्या नावांचा विचार झाला त्यांच्यासंदर्भात आणखी काही माहिती जाणून घ्यायची असल्याने पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेण्याचे ठरले आहे. बैठकीला गृहमंत्री राजनाथसिंग, अर्थमंत्री अरुण जेटली, लोकसभेतील काँग्रेस पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत केंद्रीय माहिती आयोगातील माहिती आयुक्त आणि केंद्रीय दक्षता आयोगातील दक्षता आयुक्तांचीही नावे निश्चित करायची होती. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या ६ मे रोजी सीआयसी, सीव्हीसी आणि लोकपाल नियुक्तीस होत असलेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
,माहितीचा अधिकार कायदा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने लागू केला होता. (वृत्तसंस्था)

४मुख्य माहिती आयुक्त आणि मुख्य दक्षता आयुक्ताचे पद मागील नऊ महिन्यांपासून रिक्त आहे. मुख्य माहिती आयुक्त राजीव माथुर यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात संपला होता.
४याशिवाय सीआयसीत तीन माहिती आयुक्तांचीही पदे भरायची आहेत. मुख्य माहिती आयुक्त पदासाठी २०३ आणि माहिती आयुक्तपदासाठी ५०२ इच्छुकांचे अर्ज आले आहेत.

४तर सीव्हीसीत मुख्य दक्षता आयुक्त प्रदीपकुमार आणि दक्षता आयुक्त जे.एम. गर्ग यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी अनुक्रमे २८ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबरला संपला होता.
४मुख्य दक्षता आयुक्त आणि दक्षता आयुक्तांच्या पदांसाठी जवळपास १३० अर्ज आले आहेत.

Web Title: The decision on appointment of CVC and CIC chief will be postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.