शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

सैन्य माघारीचा कालावधी ठरवा; भारताने चीनला खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 06:22 IST

चिनी अ‍ॅपवर बंदी, थेट परकीय गुंतवणुकीत बदल करून भारताने चीनच्या नाड्या आवळल्या आहेत. हे केवळ तात्पुरते उपाय नसून भविष्यात याचे आर्थिक परिणाम दिसण्याची भिती आता चीन अभ्यासकांनी व्यक्त केल्याने ड्रॅगनचा सूर नरमला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ईशान्य लद्दाख सीमेवरून सैन्य माघारीसाठी केवळ चर्चा नव्हे तर दिवस निश्चित करा, असे भारताने चीनला खडसावले आहे. एकीकडे चर्चा करायची व दुसरीकडे सैन्याची जमवाजमव ही ड्रॅगनची कुटिल नीती राजनैतिक चर्चेदरम्यान भारताने उघडकीस आणली.

चिनी अ‍ॅपवर बंदी, थेट परकीय गुंतवणुकीत बदल करून भारताने चीनच्या नाड्या आवळल्या आहेत. हे केवळ तात्पुरते उपाय नसून भविष्यात याचे आर्थिक परिणाम दिसण्याची भिती आता चीन अभ्यासकांनी व्यक्त केल्याने ड्रॅगनचा सूर नरमला. तब्बल सहा तास झालेल्या बैठकीत दोन्ही देशांनी पूर्णपणे सैन्य माघारीची तयारी दर्शवली. वर्किंग मेकेनिझम फॉर कन्सल्टेशन अँड को आॅर्डीनेशनची सोळावी बैठक पार पडली.तत्पूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात ५ जुलै रोजी दिवसभर चर्चा झाली होती. त्यात ठरल्याप्रमाणे चीनने शब्द पाळावा, असे भारताने सुनावले.

बैठकीत संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. पंधरा जूनला झालेल्या हिंसक झटापटीनंतर सीमेवर शांतता राखण्यास दोन्ही देशांनी सहकार्य केल्याचा सूर बैठकीत उमटला. मात्र सीमावादाचे परिणाम आर्थिक तसेच राजनैतिक स्तरावर होवू न देण्याचे रडणागे चिनी अधिकाऱ्यांनी गायले. त्यावर जोपर्यंत शेवटच्या सैनिकाला माघारी बोलावण्याचा दिवस निश्चित करून त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आर्थिक संबंधांवर चर्चाही न करण्याचा खमकेपणा भारताने दाखवला. भारताने गेल्या सत्तर वर्षांच्या राजनैतिक संबंधांमध्ये पहिल्यांदाच अशी कठोर भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

इंडोनेशिया-भारताची जवळीकसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इस्त्रायलचे संरक्षण मंत्री जनरल बेंजामिन गँत्झ यांच्याशी संवाद साधला. इस्त्रायलकडून लष्करी इंटेलिजंन्स देवाणघेवाणीवर त्यात चर्चा झाली. विशेष म्हणजे इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री पारबो सबॅन्टो सोमवारी (२६ जुलै) भारत दौºयावर येत आहेत. दक्षिण चीन समुद्रात आता इंडोनेशियाने चीनविरोधात शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे इंडोनेशिया-भारताची जवळीक वाढली आहे.चिनी निर्यातीवर अवलंबून असलेल्या भारतीय उद्योगांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, मात्र चीनला धडा शिकवण्याचा हाच मार्ग असल्याचेही सूत्रांनी नमूद केले. दक्षिण चीन समुद्रात आॅस्ट्रेलिया, जपान व अमेरिकेसोबत हवाई युद्धनौकांचा अभ्यास व अत्याधुनिक शस्रास्रांची खरेदी केल्याने भारताने चीनलाही समज दिली.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव