शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

31 डिसेंबरलाही अमित शहा 'ऑन डयुटी', गुजरातचा गड सर केल्यानंतर आता कर्नाटकवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:59 IST

खरंतर 31 डिसेंबर इयर एण्डचा दिवस असल्याने सर्वचजण पार्टी मूडमध्ये असतात. या दिवशी काम टाळण्याकडे बहुतांश जणांचा कल असतो.

ठळक मुद्देगुजरातचा गड सर केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आता कर्नाटकवर लक्ष केंद्रीत केले आहे. गुजरात-हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन झाल्यामुळे राजकीय आघाडीवर तशी शांतता आहे.

नवी दिल्ली - खरंतर 31 डिसेंबर इयर एण्डचा दिवस असल्याने सर्वचजण पार्टी मूडमध्ये असतात. या दिवशी काम टाळण्याकडे बहुतांश जणांचा कल असतो. यंदा तर 31 डिसेंबरला रविवार आल्याने कामाच प्रश्नच नाही. पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मात्र याला अपवाद आहेत. गुजरातचा गड सर केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आता कर्नाटकवर लक्ष केंद्रीत केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी येत्या 31 डिसेंबरला अमित शहा कर्नाटकमधील आमदार, खासदारांची बैठक घेणार आहेत. 

गुजरात-हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन झाल्यामुळे राजकीय आघाडीवर तशी शांतता आहे. पण अमित शहा मात्र या सुट्टयांच्यादिवसांमध्येही कामामध्ये व्यस्त आहेत. सध्या नाताळच्या सुट्टया असल्याने काँग्रेस मुख्यालय बंद आहे पण अमित शहा यांनी 25 डिसेंबरला भाजपा कार्यालयात पक्षाच्या सरचिटणीसांची बैठक घेतली आणि काही महत्वाचे निर्णय घेतले. पुढच्यावर्षी एप्रिलपर्यंत देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये पक्ष कार्यालय नाहीय तिथे कार्यालय सुरु करण्याचा लक्ष्य ठरवण्यात आले आहे. 

 

अमित शहा भाजपा अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पक्ष विस्तार आणि संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात बिहार, दिल्लीचा अपवाद वगळता भाजपाने पराभव पाहिलेला नाही. भाजपा एकापाठोपाठ एक राज्य काबीज करत चालला आहे. सध्या देशातील 19 राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे. 

यंदाच्यावर्षातील उत्तर प्रदेश आणि गुजरातची निवडणूक शहा यांच्यासाठी कठिण परिक्षा होती. उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठया राज्यात पूर्ण बहुमताने त्यांनी भाजपाचे सरकार आणले तर 22 वर्षानंतरही गुजरातमध्ये प्रस्थापित सरकारविरोधात लाट असतानाही सत्ता कायम टिकवण्यात त्यांना यश आले. ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये पक्ष विस्तारावर त्यांनी विशेष भर दिलायं. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागतोय पण भाजपा इथे पूर्ण ताकदीने निवडणूक लढवतोय त्याचे श्रेय शहा यांना जाते.  

टॅग्स :Amit Shahअमित शाह