डिसेंबर १३ मध्ये सर्वेक्षणांनी भाजपलाच दिला होता कौल
By Admin | Updated: February 5, 2015 02:48 IST2015-02-05T02:48:44+5:302015-02-05T02:48:44+5:30
डिसेंबर २०१३ मधील दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक सर्वेक्षणांनी आम आदमी पार्टीला ५० जागांचा अंदाज वर्तवला होता आणि तो सपशेल चुकीचा ठरला होता,

डिसेंबर १३ मध्ये सर्वेक्षणांनी भाजपलाच दिला होता कौल
मोदी तुम्ही चुकलात : ‘आप’च्या वरचष्म्यामुळेच उडविली टर
नवी दिल्ली : डिसेंबर २०१३ मधील दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक सर्वेक्षणांनी आम आदमी पार्टीला ५० जागांचा अंदाज वर्तवला होता आणि तो सपशेल चुकीचा ठरला होता, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जारी झालेल्या ओपिनियन पोलची टर उडविली असली तरी वस्तुस्थिती वेगळी आहे.
गेल्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल किंवा सरकार स्थापन करेल असा अंदाज विविध वाहिन्यांनी वर्तवला होता आणि तो खराही ठरला. त्यावेळी आपने आश्चर्यकारकरीत्या दुसऱ्या स्थानी मुसंडी मारत काँग्रेसला तिसऱ्या स्थानी ढकलले होते. मोदींनी निवडणूक विश्लेषकांवर केलेला आरोप पाहता त्यांचे विधान विसंगत असल्याचे दिसून येते. एका निवडणूक रॅलीत मोदींनी ओपिनियन आणि एक्झिट पोलवर तोंडसुख घेतल्याबद्दल राजकीय विश्लेषकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान भाजपच्या नेत्यांनी या वादात न पडता मौन पाळले आहे. टीव्ही वाहिन्या आणि निवडणूक सर्वेक्षणांवर निर्भर न राहता कामावर लक्ष केंद्रित करा असा आदेश भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
२०१३-१४ च्या निवडणुकीतील मतदान
काँग्रेस भाजप बसप आप इतर एकूण
काँग्रेस ८१ ११ १ ५ २ १००
भाजप ६ ८७ १ ५ २ १००
बसप १४ १९ ५४ १० ३ १००
आप ९ २६ १ ६० ३ १००
इतर १२ २९ १ १५ ४४ १००
डीके/ सीएस २९ ४३ ३ १४ ५ १००
एकूण २९ ४३ ३ २१ ४ १००
२०१३च्या निवडणुकीचे ‘एक्झिट पोल’ असे होते !
च्एसी नेल्सन- भाजप- ३७, काँग्रेस-१६, आप- १५
च्सी व्होटर- भाजप- ३१, काँग्रेस- २० आप-१५
च्इंडिया टुडे- ओआरजी- भाजप- ४१, काँग्रेस-२० आप- ६
च्सीएनएन- आयबीएन- सीएसडीएस- भाजप- ३२ ते ४२ काँग्रेस ९ ते १७ आप १३ ते २१