शीर नसलेला तो मृतदेह अभिनेत्री सासीरेखाचा, नव-याला अटक
By Admin | Updated: February 7, 2016 16:34 IST2016-02-07T16:34:16+5:302016-02-07T16:34:16+5:30
महिन्याभरापूर्वी चेन्नईत कचराकुंडीजवळ शीर नसलेला महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली असून, हा मृतदेह दूरचित्रवाहिनी अभिनेत्री सासीरेखाचा आहे.

शीर नसलेला तो मृतदेह अभिनेत्री सासीरेखाचा, नव-याला अटक
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ७ - महिन्याभरापूर्वी चेन्नईत कचराकुंडीजवळ शीर नसलेला महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली असून, हा मृतदेह दूरचित्रवाहिनी अभिनेत्री सासीरेखाचा आहे. ३६ वर्षीय सासीरेखाची पती रमेश आणि त्याची प्रेयसी लॉकिया या दोघांनी मिळून हत्या केली होती.
पोलिसांनी दोघांना अटक करुन हत्या, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. चौकशीमध्ये रमेश आणि लॉकियाने सासीरेखाची हत्या केल्याची कबुली दिली. सासीरेखाची हत्या करुन तिचा मृतदेह दोन ठिकाणी टाकल्याचे त्यांनी सांगितले.
सासीरेखाच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. रमेशला व्यवसायात मोठा तोटा झाल्यानंतर त्याची पहिली पत्नी आणि पालकांनी आत्महत्या करुन जीवन संपवले. त्यानंतर तो अभिनयाच्या क्षेत्राकडे वळला.
रमेश आणि लॉकिया २०१२ पासून एकत्र रहात होते. चित्रपटात काम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन रमेशने अनेकांकडून पैसे उकळले होते. लॉकियासोबत प्रेम प्रकरण सुरु असतानाचे त्याची सासीरेखाबरोबर ओळख झाली.
सासीरेखाला आठवर्षांचा मुलगा होता. ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांनी लग्न केले. सासीरेखाबरोबर वाद सुरु झाल्यानंतर तो पुन्हा लॉकियाबरोबर राहू लागला.