डेक्कन क्रॉनिकलच्या अध्यक्षांना अटक

By Admin | Updated: February 15, 2015 01:25 IST2015-02-15T01:25:46+5:302015-02-15T01:25:46+5:30

हैदराबादेतील इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकलचे अध्यक्ष टी. व्यंकटरमण रेड्डी यांना शनिवारी सीबीआयने अटक केली.

Deccan Chronicle Chairman arrested | डेक्कन क्रॉनिकलच्या अध्यक्षांना अटक

डेक्कन क्रॉनिकलच्या अध्यक्षांना अटक

नवी दिल्ली : हैदराबादेतील इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकलचे अध्यक्ष टी. व्यंकटरमण रेड्डी यांना शनिवारी सीबीआयने अटक केली. त्यांच्यावर कॅनरा बँकेकडून घेतलेले ३५७ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा कथित आरोप लावण्यात आला आहे.
सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनरा बँक,बंगलोरतर्फे डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्ज लिमिटेडविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे जुलै २०१३ मध्ये तपास संस्थेने कंपनीवर गुन्हा नोंदविला होता. त्याच प्रकरणात रेड्डी यांना अटक झाली आहे.
सीबीआयने २०१३ मध्ये रेड्डी यांच्याविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा नोंदविला होता. कंपनीने परतफेड न केलेल्या कर्जाच्या रकमेची पुनर्आखणी करण्यास बँकेने नकार दिला होता.
बंगलोर येथे रेड्डी यांचा जाबजबाब घेतल्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी. विनायक रेड्डी यांनाही अटक करण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रानी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Deccan Chronicle Chairman arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.