क्रिकेट खेळण्यावरुन वाद *प्राचार्यांना अटक
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:09+5:302014-12-20T22:28:09+5:30
ठाणे- वागळे इस्टेट परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात क्रि केट खेळण्यावरून प्रशिक्षण केंद्राचे प्रायार्य आणि शिक्षक यांनी पाच विद्यार्थ्यांना बांबूने मारहाण केल्याची घटना शुक्र वारी घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राचार्यांना अटक केली आहे .

क्रिकेट खेळण्यावरुन वाद *प्राचार्यांना अटक
ठ णे- वागळे इस्टेट परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात क्रि केट खेळण्यावरून प्रशिक्षण केंद्राचे प्रायार्य आणि शिक्षक यांनी पाच विद्यार्थ्यांना बांबूने मारहाण केल्याची घटना शुक्र वारी घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राचार्यांना अटक केली आहे . वागळे इस्टेट परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या दुसर्या वर्षात शिकणारे विद्यार्थी सुरज मोकाशी, संदीप पिसाळ, विराज मांडवकर,संदीप शिर्के, प्रवीण कांबळे आणि भूषण बांगर या सर्व विद्यार्थ्यांना ही मारहाण करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत कॉलेज असते. त्यानंतर साडेचार वाजेपर्यंत प्रात्यिक्षक प्रशिक्षण असते. मात्र शुक्र वारी त्यांचे प्रशिक्षण तास रद्द झाल्याने हे सर्व विद्यार्थी केंद्राच्या प्रांगणात क्रि केट खेळत होते. दरम्यान या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य व एका शिक्षकाने या विद्यार्थ्यांना क्रि केट खेळण्याच्या रागातून या विद्यार्थ्यांना बांबूने मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्यांच्या पाठीवर, हातावर वण आले आहेत. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी श्रीनगर पोलीस ठाणे गाठले. त्यांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्याच्या सिव्हील रु ग्णालयात नेण्यात आले. दरम्यान याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच प्राचार्यांना अटक केली आहे़...............वाचली- नारायण जाधव