मोदींच्या 'त्या' सूटवरुन वाद

By Admin | Updated: January 27, 2015 11:03 IST2015-01-27T10:55:32+5:302015-01-27T11:03:29+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौरा चांगलाच गाजत असतानाच हैद्राबाद हाउसमधील ओबामांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी घातलेल्या सूटवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.

Debate over Modi's 'That' suit | मोदींच्या 'त्या' सूटवरुन वाद

मोदींच्या 'त्या' सूटवरुन वाद

 ऑनलाइन लोकमत 

नवी गिल्ली, दि. २७ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौरा चांगलाच गाजत असतानाच हैद्राबाद हाउसमधील ओबामांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी घातलेल्या सूटवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. या सूटवर नरेंद्र दामोदार दास मोदी असे लिहीले असून यावरुन सोशल मिडीयावर टीका सुरु झाली आहे. 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैद्राबाद हाउसमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. या  पत्रकार परिषदेत मोदींनी बंद गळ्याचा सूट घातला होता. या सूटवर सरळ रेषेत 'नरेंद्र दामोदरदास मोदी' असे लिहील्याचे समोर आले आहे.  सोशल मिडीयावर अनेकांनी यावरुन मोदींवर टीका केली आहे. काँग्रेस नेते संजय झा यांनी ट्विटकरुन मोदींवर निशाणा साधला. मोदींच्या सूटवर त्यांचे नाव लिहीले असेल तर त्यांच्या या आत्म मग्नतेचे मला आश्चर्यच वाटते असा टोला त्यांनी लगावला आहे. तर याऊलट काही जणांनी मोदींचे समर्थन करणारे ट्विट केले आहे. मोदींनी आता प्रसारमाध्यमांना विचारुन कपडे घालायला हवे असे एकाने म्हटले आहे. 
मोदींचा हा सूट अहमदाबादमधील झेड ब्लू टेलर्समध्ये तयार करण्यात आला आहे. या सूटवरील डिझाईन हाताने तयार करण्यात आले असून त्याची किंमत ८० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत असू शकते असा अंदाज आहे. इजिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक हेदेखील असे सूट घालण्यासाठी ओळखले जात होते. 

Web Title: Debate over Modi's 'That' suit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.