पाकच्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: August 4, 2015 12:52 IST2015-08-04T10:39:07+5:302015-08-04T12:52:13+5:30

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरुच असून मंगळवारी सकाळी पाक सैन्याने भारतीय चौक्या व निवासी विभागांवर गोळीबार केला असून यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Death of a youth in a firing in Pakistan | पाकच्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू

पाकच्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत 
श्रीनगर, दि. ४ - नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरुच असून मंगळवारी सकाळी पाक सैन्याने भारतीय चौक्या व निवासी विभागांवर गोळीबार केला. या गोळीबारात सीमा रेषेजवळील पगरवाल या गावात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. 
मंगळवारी पहाटेपासून पाकिस्तानी सैन्याने जम्मूतील पगरवाल, कानाचक सेक्टर येथील नियंत्रण रेषेवरील १२ भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पाक सैन्याचे मोर्टार सीमा रेषेलगतच्या गावांमध्येही पडले. यामुळे सीमा रेषेवरील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यात पखनेर येथे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
ऑगस्टच्या पहिल्या चार दिवसांमध्ये पाकने आठ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर जुलैमध्ये १८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून यात तीन जवान व एक नागरिक अशा चौघांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Death of a youth in a firing in Pakistan