स्टोव्हच्या भडक्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: September 4, 2015 22:45 IST2015-09-04T22:45:52+5:302015-09-04T22:45:52+5:30

नागपूर : माहेरी आलेल्या एका महिलेचा स्टोव्हच्या भडक्याने भाजून मृत्यू झाला. कीर्ती उद्धव वारजूरकर (वय ३०) असे या महिलेचे नाव आहे.

The death of the woman by the stove of a stove | स्टोव्हच्या भडक्याने महिलेचा मृत्यू

स्टोव्हच्या भडक्याने महिलेचा मृत्यू

गपूर : माहेरी आलेल्या एका महिलेचा स्टोव्हच्या भडक्याने भाजून मृत्यू झाला. कीर्ती उद्धव वारजूरकर (वय ३०) असे या महिलेचे नाव आहे.
कीर्ती या मोहाडी (नागभीड, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी होत. त्यांचे माहेर गिट्टीखदानमधील वीरचक्र कॉलनीत आहे. ३० ऑगस्टला कीर्ती आईच्या घरी स्टोव्ह पेटवत असताना दुपारी २ च्या सुमारास स्टोव्हचा अचानक भडका झाल्याने त्या जळाल्या. त्यांना उपचाराकरिता मेयोत दाखल करण्यात आले. तेथे शुक्रवारी दुपारी १.२० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---

Web Title: The death of the woman by the stove of a stove