केंदूर येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30
केंदूर : येथील सीताबाई बाबाजी दौंडकर (वय ५५) या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सीताबाई या दुपारी दीडच्या सुमारास जनावरांच्या चार्याची पेंढी काढण्यासाठी गेल्या असताना त्यामध्ये लपून बसलेल्या सापाने त्यांच्या हाताला दंश केला. सापाचा दंश झाल्याचे समजल्यानंतर लगेचच केंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना हलवण्यात आले. प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. सारिका तायवडे यांनी सर्पदंशावरील प्राथमिक लस व प्राथमिक उपचारही केले. मात्र, सापाच्या विषाची तीव्रता अधिक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी दावाखान्यातील रुग्णवाहिनी व दोन कर्मचार्यांसह पाठविण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. केंदूर व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर सुमारे ८ हजारांच्या आसपास लोकसंख्या असून या घटनेमुळे अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास सुविधा मिळणे गरजचे असून कायमस्वरूप्

केंदूर येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
क ंदूर : येथील सीताबाई बाबाजी दौंडकर (वय ५५) या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सीताबाई या दुपारी दीडच्या सुमारास जनावरांच्या चार्याची पेंढी काढण्यासाठी गेल्या असताना त्यामध्ये लपून बसलेल्या सापाने त्यांच्या हाताला दंश केला. सापाचा दंश झाल्याचे समजल्यानंतर लगेचच केंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना हलवण्यात आले. प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. सारिका तायवडे यांनी सर्पदंशावरील प्राथमिक लस व प्राथमिक उपचारही केले. मात्र, सापाच्या विषाची तीव्रता अधिक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी दावाखान्यातील रुग्णवाहिनी व दोन कर्मचार्यांसह पाठविण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. केंदूर व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर सुमारे ८ हजारांच्या आसपास लोकसंख्या असून या घटनेमुळे अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास सुविधा मिळणे गरजचे असून कायमस्वरूपी निवासी डॉक्टरही असणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.०००