मृत्यू विनोद खन्नांचा पण "टिवटिव" विनोद कांबळीवर !

By Admin | Updated: April 29, 2017 07:20 IST2017-04-29T06:36:46+5:302017-04-29T07:20:08+5:30

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता विनोद खन्ना यांच्या मृत्यूची बातमी गुरूवारी समोर आल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Death Vinod Khan's "Tivitiv" Vinod Kambli! | मृत्यू विनोद खन्नांचा पण "टिवटिव" विनोद कांबळीवर !

मृत्यू विनोद खन्नांचा पण "टिवटिव" विनोद कांबळीवर !

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता विनोद खन्ना यांच्या मृत्यूची बातमी गुरूवारी समोर आल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. विनोद खन्ना यांच्या मृत्यूचं वृत्त आल्यानंतर लगेचच ट्विटरवर  #VinodKhanna ट्रेंड व्हायला सुरूवात झाली. एकिकडे त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना एका खोडकर ट्विटर युझरने जाणूनबुजून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला टॅग केलं. त्यानंतर ट्विटराइट्सनी कांबळीला ट्रोल करायला सुरूवात केली. 
 
आपल्याला जाणूनबुजून ट्रोल करण्यात आल्याचं समजल्यानंतर विनोद कांबळी चांगलाच संतापला. विनोद खन्नांसोबत आपल्याला मुद्दाम टॅग करणा-या युझरला रिप्लाय देताना त्याने आपल्या संतापाला वाट करून दिली. ""विनोद खन्नांच्या मृत्यूबाबत ट्विट करतायेत आणि मलाही टॅग करतायेत...तुम्हाला लाज वाटायला पाहीजे... विनोद खन्नांसारख्या अष्टपैलू अभिनेत्यासाठी थोडातरी आदर दाखवा...माझ्यावर ज्यांनी ट्विट केलंय देव त्यांना नक्कीच धडा शिकवेल..."
 
कांबळीच्या रिप्लायनंतर त्या खोडकर युजरने आपलं ट्विट डीलिट केलं आणि थोड्यावेळाने इतर युझर्सनीपण कांबळीला ट्रोलिंग करणं थांबवलं.  
 

Web Title: Death Vinod Khan's "Tivitiv" Vinod Kambli!