हैदराबादमध्ये पोलीस गोळीबारात दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: May 14, 2014 14:36 IST2014-05-14T14:36:27+5:302014-05-14T14:36:27+5:30

आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबाद येथे उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी गोळीबार केल्याने यात दोन जणांचा मृत्यू झाला.

Death of two in police firing in Hyderabad | हैदराबादमध्ये पोलीस गोळीबारात दोघांचा मृत्यू

हैदराबादमध्ये पोलीस गोळीबारात दोघांचा मृत्यू

ऑनलाइन टीम 
हैदराबाद, दि. १४ - आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबाद येथे उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी गोळीबार केल्याने यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली असून या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या हैदराबादमधील बहादुरपुरा येथील शिख छावणीमध्ये एका धर्माचा झेंडा जाळल्याने दोन गटांत बाचाबाची झाल्यानंतर दंगल उसळली. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला तर सात जण जखमी झाले. सायराबादचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून या ठिकाणच्या परिस्थितीवर पोलिसांचे नियंत्रण असल्याची माहिती त्यांनी दिली. 

 

Web Title: Death of two in police firing in Hyderabad