लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात दूषित कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूचे सत्र थांबायला तयार नाही. मागील १६ तासांत दीड ते दोन वर्षांच्या तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. ही सर्व बालके मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया येथील असून, त्यांच्यावर नागपुरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. कफ सिरप सेवनाने झालेल्या संशयित मृत्यूंची संख्या आता १६ वर पोहोचली आहे.
‘शर्थीचे प्रयत्न करूनही वाचवू शकलो नाही’
दूषित कफ सिरपच्या सेवनामुळे गंभीर झालेली दीड वर्षाची चिमुकली धानी डेहरिया ही २८ सप्टेंबर रोजी नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल झाली. शर्थीच्या उपचारानंतरही सोमवारी रात्री ११ वाजता तिचा मृत्यू झाला.
मेडिकलमध्येच उपचार घेत असलेली २ वर्षांची जयूषा यदुवंशी हिचा मृत्यू मंगळवारी दुपारी २ वाजता झाला. तर, २२ दिवसांपासून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला दोन वर्षांचा वेदांश पवार याने मंगळवारी दुपारी ४ वाजता शेवटचा श्वास घेतला.
शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवू शकले नाही, अशी खंत कलर्स हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश अग्रवाल व मेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
Web Summary : Contaminated cough syrup in Madhya Pradesh led to 16 deaths. Three children, aged between 1.5 to 2 years, died in Nagpur hospitals within 16 hours. Doctors expressed grief over their inability to save them.
Web Summary : मध्य प्रदेश में दूषित कफ सिरप से 16 मौतें हुईं। नागपुर के अस्पतालों में 16 घंटों में डेढ़ से दो साल के तीन बच्चों की मौत हो गई। डॉक्टर उन्हें बचाने में असमर्थता पर दुख व्यक्त करते हैं।