कर्नाटकमध्ये टिपू सुलतान जयंतीवरुन वाद, विहिंप नेत्याचा मृत्यू
By Admin | Updated: November 10, 2015 13:50 IST2015-11-10T13:45:27+5:302015-11-10T13:50:43+5:30
कर्नाटक सरकारतर्फे टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यावरुन सुरु झालेल्या वादाला आता हिंसक वळण लागले आहे.

कर्नाटकमध्ये टिपू सुलतान जयंतीवरुन वाद, विहिंप नेत्याचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. १० - कर्नाटक सरकारतर्फे टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यावरुन सुरु झालेल्या वादाला आता हिंसक वळण लागले आहे. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला असून या घटनेसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
टिपू सुलतान यांची आज जयंती असून यानिमित्त कर्नाटक सरकारने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. टिपू सुलतान हे असहिष्णू राजा असल्याचा दावा करत हिंदूत्ववादी संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. मंगळवारी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्त्यांनी विरोध प्रदर्शानाला सुरुवात केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला व यात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक कुटप्पा यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत राज्यभरात आंदोलन करु असा इशारा दिला आहे.