निधन वार्ता
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:01+5:302015-01-22T00:07:01+5:30
निधन वार्ता

निधन वार्ता
न धन वार्ता लक्ष्मणराव इंगळे (फोटो २१पीएचओ-१४)नवीन सुभेदार गजानन मंदिर येथील लक्ष्मण दौलतराव इंगळे यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मंदाकिनी येरपुडे (फोटो) तात्या टोपेनगर येथील मंदाकिनी येरपुडे यांचे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, चार मुले, दोन मुली, नातू, पणतू व बराच मोठा परिवार आहे. जगन्नाथ चांडक तार बाजार काटोल येथील माहेश्वरी समाजातील ज्येष्ठ सदस्य जगन्नाथ चांडक यांचे निधन झाले. त्यांच्यावर काटोल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली व बराच मोठा परिवार आहे. रॉबिन नाईक (फोटो) सिरसपेठ येथील रॉबिन दिनेशराव नाईक यांचे निधन झाले. ते २९ वर्षांचे होते. मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मोठा आप्त परिवार आहे. रुपेश घाटोळे (एच/डेली/२१रुपेश) जुनी मंगळवारी येथील रुपेश मदनराव घाटोळे यांचे निधन झाले. ते ३७ वर्षांचे होते. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ, एक बहीण व बराच मोठा परिवार आहे. भय्याजी देवतळे (फोटो) प्रशांतनगर अजनी येथील भय्याजी ऊर्फ पंजाबराव रामभाऊ देवतळे यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांचे मूळगाव गुमगाव ता. हिंगणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, नातवंडे व बराच मोठा परिवार आहे. सुनिता हुद्दार हिंदुस्थान कॉलनी अमरावती रोड येथील सुनिता अनुप हुद्दार यांचे निधन झाले. त्या ४३ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. शांताराम बरडे (फोटो) गोळीबार चौक येथील शांताराम दशरथ बरडे यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली व बराच मोठा परिवार आहे.