मुलगा चावल्याने सापाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:04 IST2017-08-18T05:04:53+5:302017-08-18T05:04:55+5:30

साप चावल्याने मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील

The death of the snake after biting a boy | मुलगा चावल्याने सापाचा मृत्यू

मुलगा चावल्याने सापाचा मृत्यू

साप चावल्याने मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण, उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील ही घटना ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कारण, एका मुलाने चावा घेतल्याने एका सापाचा मृत्यू झाल्याची आश्चर्यकारक घटना येथे घडली आहे. रसूलपूर येथील रहिवासी राकेश यादव यांच्या घरात ५ फूट लांब साप आला. यावेळी त्यांचा घरात लहान मुलगा खेळत होता. खेळणे समजून या मुलाने सापाला पकडले आणि त्याला चावला. या मुलाची आई घरातून बाहेर येऊन पाहते तो काय साप मरून पडला होता. या मुलाला तत्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन मुलाची प्रकृती ठिक असल्याचे सांगितले. अर्थात, मुलाची जीभ निळी झाली होती. तज्ज्ञांचे असे मत आहे की, या मुलाने सापाच्या तोंडाची मागची बाजू जोराने पकडल्याने सापाचा गुदमरून मृत्यू झाला असावा.

Web Title: The death of the snake after biting a boy