प्रसुतीच्या दुसर्‍याच दिवशी महिलेचा बाळासह मृत्यू

By Admin | Updated: January 28, 2016 22:58 IST2016-01-28T22:58:47+5:302016-01-28T22:58:47+5:30

जळगाव: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या कविता गोपाल मगरे (वय २० रा.गोद्री ता.जामनेर) या विवाहितेचा गुरुवारी दुपारी चार वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कविता यांना कावीळची लागण झाली होती. प्रसूतीसाठी त्यांना मंगळवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी प्रसूती होऊन मुलाला जन्म दिला, मात्र बाळही मृतच झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी चार वाजता विवाहितेचाही मृत्यू झाला. पुणाई ता.बुलढाणा येथील माहेर असलेल्या कविता हिचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता.

Death on the second day of pregnancy with the baby's baby | प्रसुतीच्या दुसर्‍याच दिवशी महिलेचा बाळासह मृत्यू

प्रसुतीच्या दुसर्‍याच दिवशी महिलेचा बाळासह मृत्यू

गाव: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या कविता गोपाल मगरे (वय २० रा.गोद्री ता.जामनेर) या विवाहितेचा गुरुवारी दुपारी चार वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कविता यांना कावीळची लागण झाली होती. प्रसूतीसाठी त्यांना मंगळवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी प्रसूती होऊन मुलाला जन्म दिला, मात्र बाळही मृतच झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी चार वाजता विवाहितेचाही मृत्यू झाला. पुणाई ता.बुलढाणा येथील माहेर असलेल्या कविता हिचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता.

रिक्षावर कार धडकली
जळगाव : पुढे चालणार्‍या रिक्षाने (क्र.एम.एच.१९ व्ही.७७७५) अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून येणारी कार (क्र.एम.एच.१९ ए.एक्स ९७२१) रिक्षावर आदळली. यात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. हा अपघात गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता गोलाणी मार्केट परिसरातील मोहन डायनिंग हॉलसमोर झाला. यावेळी दोन्ही वाहनधारकांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला होता.

Web Title: Death on the second day of pregnancy with the baby's baby