होरपळलेल्या महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: November 17, 2015 00:30 IST2015-11-15T21:13:41+5:302015-11-17T00:30:40+5:30

अहमदपूर : गंभीररीत्या भाजलेल्या एका २५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान लातूरच्या सरकारी दवाखान्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात शनिवारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Death of a scattered woman | होरपळलेल्या महिलेचा मृत्यू

होरपळलेल्या महिलेचा मृत्यू

अहमदपूर : गंभीररीत्या भाजलेल्या एका २५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान लातूरच्या सरकारी दवाखान्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात शनिवारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्योती माधव मरसुणे (वय २५, रा. मोहिजा परंडा, ता. कंधार, ह.मु. सिंदगी बु., ता. अहमदपूर) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. ज्योती मरसुणे ही गंभीररीत्या भाजली होती. त्यामुळे तिच्यावर लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असताना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी डॉ. एस.ए. अलिम यांच्या माहितीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक केणेकर करीत आहेत.

Web Title: Death of a scattered woman