धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:07+5:302014-12-20T22:28:07+5:30

धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

Death by running train | धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

वत्या रेल्वेतून पडून मृत्यू
ओळख पटली : सोनखांब रेल्वेस्थानकाजवळील घटना
नागपूर : धावत्या गाडीतून पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोनखांब रेल्वेस्थानकाजवळ सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली आहे.
सज्जन रामसन पांडेय (२६) रा. देवतुला जि. रिवा असे या प्रवाशाचे नाव आहे. सकाळी ८ वाजता त्याचा मृतदेह सोनखांब रेल्वेस्थानकाजवळ किलोमीटर क्रमांक ९९७/३४ येथे पडून असल्याची माहिती उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाने लोहमार्ग पोलिसांना दिली. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह सायंकाळच्या सुमारास डेहराडून एक्स्प्रेसने नागपुरात आणण्यात आला. नागपुरात आल्यानंतर मृताच्या नातेवाईकाने त्याची ओळख पटविली. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला आहे. मृत रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकणारा व्हेंडर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेल्वेगाडीत प्रवास करताना कोचच्या दारावर उभे राहून किंवा पायदानावर बसून प्रवास करणे धोकादायक आहे. परंतू तरीसुद्धा अनेक प्रवासी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अशा प्रकारच्या घटनात वाढ होत आहे. (प्रतिनिधी)
...............

Web Title: Death by running train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.